Ravindra Dhangekar On Worli Hit & Run Case | वरळीतील हिट अँड रन प्रकरणी आमदार धंगेकरांचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले, ” मुख्य आरोपी फरार…”

ravindra dhangekar

मुंबई : Ravindra Dhangekar On Worli Hit & Run Case | पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक होत आवाज उठवला होता. पोलीस आयुक्तालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग याठिकाणी जात त्यांनी या विभागाच्या कार्यपद्धतीवरून प्रश्न विचारत आंदोलनही केले होते. मुंबईतील वरळीत काल (दि. ७) भीषण अपघाताची घटना घडली. भरगाव वेगात असलेल्या एका बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक देत महिलेला काही अंतर फरफटत नेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीने वेळीच उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.

अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा (Mihir Rajesh Shah) हा होता. या अपघाताच्या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला. पोलिसांनी चौकशीसाठी राजेश शहा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम १०५, २८१, १२५, ,२८१, १२५ (ब), २३८, ३२४ (४) आणि १८४, १३४ (अ), १३४ (ब ), १८७ मोटार वाहन कायद्यानुसार मिहीरवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान आता या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला नाही तर मी स्वतः वरळीत जाऊन आंदोलन करेल असा इशारा आमदार धंगेकरांनी दिला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अजून अटक का केली नाही? याचा जाब विचारण्यासाठी धंगेकर आज वरळी पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

वरळीतील घटना गंभीर आहे यामध्ये दोन जणांना अटक केलेली असली तरी मुख्य आरोपी अजून फरार आहे. तो कसा काय फरार झाला? त्यामागे कोण आहे? मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल आमदार धंगेकरांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed