RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा, डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना
मुंबई : RBI Guidelines | जर तुम्ही नेट बँकिंग, यूपीआयसह इतर (UPI) ऑपशनद्वारे डिजिटल पेमेंट (Digital Payments) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकिंग नियामक, आरबीआयने डिजिटल पेमेंट सिस्टम (Digital Payment System) आणखी मजबूत करण्यासाठी बँक आणि NBFC ला महत्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
आरबीआयने म्हटले की, ट्रांजक्शन ऑथेंटिकेशनसाठी आता एसएमएस आधारित ओटीपीच्या पुढे आणखी एक पाऊल टाकण्याची गरज आहे. या गाईडलाईन्सद्वारे आरबीआय डिजिटल पेमेंटबाबत होत असलेल्या सायबर फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. जर बँक आणि एनबीएफसीने, आरबीआयच्या सुचनांच्या आधारावर अशी सिस्टम डेव्हलप केली तर सायबर गुन्हेगारांना डिजिटल फसवणूक करणे अवघड होईल.
आरबीआयने बुधवारी डिजिटल पेमेंटसाठी अल्टरनेटिव्ह ऑथेंटिकेशन मेकानिझमवर गाईडलाईन्स जारी केली. आरबीआयचे म्हणणे आहे की, ओटीपी आधारित टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चांगल्या प्रकारे काम करत आहे, परंतु हायटेक तंत्रज्ञानाच्या या काळात याच्यापेक्षा एक पाऊल आणखी पुढे टाकण्याची गरज आहे. (Online Cheating Fraud Case)
काय आहे अॅडिशनल ऑथेंटिकेशन फॅक्टर
भारतात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्या सोबतच ऑनलाईन बँकिंग फसवणुकीची प्रकरणे सुद्धा वाढत आहेत. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी आरबीआईने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टम आणखी अपग्रेड करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
सध्या, एखाद्या ट्रांजक्शनसाठी ग्राहकाला ओटीपी सबमिट करावा लागतो. परंतु, आता आरबीआयला एसएमएस आधारित ओटीपीपेक्षा जास्त डायनॅमिक सिस्टम हवी आहे. आरबीआयने म्हटले की, ऑथेंटिकेशनसाठी एसएमएस सोबतच आणखी एक पद्धत अवलंबण्याची गरज आहे, यास आरबीआयने अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हटले आहे.
आरबीआयचे म्हणणे आहे की, अॅडिशनल टू फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे बँक आणि एनबीएफसीने
अशी सिस्टम तयार करावी, ज्यामध्ये हे समजले पाहिजे की हे ट्रांजक्शन कोणत्या लोकेशनवरून होत आहे.
बँक ट्रांजक्शनच्या वेळी ग्राहकाला अलर्ट पाठवला गेला पाहिजे.
ट्रांजक्शन पूर्ण करण्यापूर्वी बँकांना ग्राहकाची सहमती घ्यावी लागेल की त्याला व्यवहार करायचा आहे.
तसेच, ग्राहकाला हा अधिकार असेल की तो ट्रांजक्शन रद्द करू शकतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune News | दोन वर्षाचा आमोद पावसाच्या पाण्यात बुडाला; डॉक्टरांनी ‘सीपीआर’ दिला अन् तो वाचला!
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात