Reliance Jio News | महाराष्ट्रामध्ये जीओचा दबदबा कायम; ऑक्टोबर महिन्यात तब्बल 4.70 लाख ग्राहकांची भर – ट्राय
Reliance Jio News | रिलायन्स जिओ ने ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रात 4.70 लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिओ ने गेले 3 महिने आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने भर घातली आहे .
यासोबतच इतर टेलिकॉम ऑपरेटर्स ने मात्र नाममात्र भर घातल्याचे दिसून येते . ट्राय च्या आकडेवारीनुसार भारती एअरटेल 1.75 लाख तर व्होडा आयडिया ने 33,768 नवीन ग्राहकांची भर घातली आहे तर बीएसएनएल ने 6448 नवीन ग्राहकांची भर घातली आहे
राज्यात, फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) क्षेत्रात जिओ आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून, जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या 572801 इतकी झाली असून तुलनेत एअरटेल चे 217618 ग्राहक नोंदवले आहेत .
जिओ च्या जलद नेटवर्क विस्तार, परवडणाऱ्या योजना आणि एकत्रित डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गृह व व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडतो आहे. शहरी व ग्रामीण भागांतून वेगवान इंटरनेटची वाढती मागणी लक्षात घेता, जिओ ही डिजिटल दरी मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रिलायन्स जिओने ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील वाढीचं नेतृत्व केलं. एअरटेलपेक्षा तब्बल 1.6 पट जास्त ग्राहक जोडत जिओने आपला बाजार हिस्सा 41.4% पर्यंत वाढवला. सक्रिय ग्राहक, वायरलाइन आणि ब्रॉडबँड या तिन्ही विभागांमध्ये जिओ अव्वल ठरलं. जिओएअरफायबर आणि 5G रोलआउटमुळे ही वाढ अधिक वेगाने झाली असून, भारताच्या डिजिटल परिवर्तनामागील प्रमुख शक्ती म्हणून जिओने आपली मजबूत भूमिका अधिक दृढ केली आहे.
