Reliance Jio | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एआयशी जोडतय रिलायन्स जिओ ! गूगल जेमिनी आणि जिओ एआय क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांना एआय-भविष्याच्या तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट प्रशिक्षण

Reliance Jio | Reliance Jio connects students in Maharashtra with AI! Excellent training for students on AI-future technologies through Google Gemini and Jio AI Classroom

Reliance Jio | रिलायन्स जिओ प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. या उपक्रमांतर्गत जिओ महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांना गूगल जेमिनी एआय, जिओ एआय क्लासरूम तसेच इतर अत्याधुनिक एआय टूल्सचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 1,000 हून अधिक शाळांचा समावेश झाला असून 7,200 पेक्षा जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिओचे वरिष्ठ अधिकारी संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण आणि संवादात्मक सत्रांचे आयोजन करत आहेत. या सत्रांद्वारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गूगलचा सर्वात सक्षम एआय सिस्टीम असलेल्या गूगल जेमिनीची ओळख करून दिली जाते. शैक्षणिक उत्कृष्टता, तांत्रिक कौशल्ये, सर्जनशीलता तसेच सहकार्याने अध्यापन व अध्ययन यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रात्यक्षिक वापरांवर विशेष भर दिला जात आहे.

या सत्रांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी नोट्स तयार करणे, असाइनमेंट लिहिणे, कोडिंग, प्रोजेक्ट आयडिएशन, डिझाइन, मुलाखतीची तयारी आदी विविध कामांसाठी नोटबुकएलएमसारख्या एआय टूल्सचा वापर करून प्रभावी प्रॉम्प्ट कसे तयार करावेत, याचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळते. तसेच जेमिनी लाइव्ह हे फीचर विशेष लोकप्रिय ठरत असून, ते वापरकर्त्यांच्या पसंतीच्या भाषेत प्रश्नांची उत्तरे देण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिओ आपल्या सर्व अनलिमिटेड 5जी ग्राहकांना ₹35,100 मूल्याचा ‘गूगल जेमिनी प्रो प्लॅन’ 18 महिन्यांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून देत आहे. हा प्लॅन माय जिओ अ‍ॅपद्वारे सक्रिय करता येतो. या प्रीमियम एआय प्लॅनमध्ये लेटेस्ट गूगल जेमिनी 3 प्रो मॉडेल, एआय-सहाय्यित प्रतिमा निर्मितीसाठी नॅनो बनाना प्रो, व्हिडिओ निर्मितीसाठी वीईओ 3.1, शैक्षणिक संशोधनासाठी नोटबुकएलएम तसेच 2 टीबी क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे.

याशिवाय, तरुणांच्या कौशल्य विकासाचा विचार करून जिओने चार आठवड्यांचा मोफत ऑनलाइन ‘जिओ एआय क्लासरूम’ कोर्सही सुरू केला आहे. विद्यार्थी हा कोर्स jio.com/ai-classroom या संकेतस्थळावर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात आणि एआयशी संबंधित प्रात्यक्षिक ज्ञान मिळवू शकतात.

You may have missed