Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी, ‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
नवी दिल्ली : Reliance Retail | मुकेश अंबानी यांच्या घरी १२ जुलैला होत असलेल्या अनंत आणि राधिका यांच्या विवाहाची तयारी जोरदार सुरू आहे. परंतु, अनंतच्या विवाहापूर्वी अंबानी कुटुंबाकडून आणखी एक मोठी बातमी येत आहे. इकॉनॉमिक टाइम्स (ET) च्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल स्पोर्टसच्या वस्तू विकणारा ब्रँड आणण्याची तयारी करत आहे. हा ब्रँड फ्रान्सची प्रसिद्ध स्पोर्टस चेन Decathlon सोबत स्पर्धा करेल (Reliance Retail Store Like Decathlon).
ईटीच्या वृत्तानुसार, रिलायन्सला दिल्ली-मुंबई आणि चेन्नई सारख्या शहरात योग्य लोकेशनवर ८,००० ते १०,००० स्क्वेअर फूट एरियात शोरूम उघडायचे आहेत. नव्या ब्रँडचे नाव काय असेल, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
रिलायन्स डेकॅथलॉनचे यशस्वी बिझनेस मॉडल फॉलो करणार आहे. म्हणजे रिलायन्स रिटेल डेकॅथलॉनप्रमाणे स्पोर्टस वेयर आणि त्याच्याशी संबंधित इतर साहित्य विकणार आहे. डेकॅथलॉन स्पोर्टस साहित्याशी संबंधीत १० आऊटलेट सुरू करण्याचा प्लान करत आहे.
ही बातमी त्या रिपोर्टनंतर आली आहे ज्यामध्ये म्हटले आहे
की, रिलायन्स रिटेल काही आठवड्यातच चीनची फास्ट-फॅशन कंपनी Shein भारतात आणत आहे.
Shein एक जागतिक पातळीवर प्रसिद्ध ब्रँड आहे,
जो भारत सरकारने २०२० मध्ये चीनसोबत सीमेवर तणाव सुरू असताना अनेक चीनी अॅप्ससोबत बॅन केला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?