Reshma Khan | रेश्मा खान यांची नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी निवड
पुणे : Reshma Khan | नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या पश्चिम महाराष्ट्र अर्थात पुणे विभागाच्या संयोजक ( कन्वेनर ) पदावर कोंढवा येथिल सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेश्मा खान यांची निवड करण्यात आली आहे.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या विशेष बैठकीत खान यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी राहुल डंबाळे यांचेसह समीर पटेल , ॲड. दानीश पठाण , असिफ खान , निलोफर मुल्ला , प्रभु सुनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून रेश्मा खान परिचित असुन त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.
