Revenue Department Inspection Pune | महसूलमंत्री विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी?; पुण्यातील महसूल कार्यालयांच्या तपासणीचा आदेश

Radhakrishna Vikhe Patil-Ajit Pawar

पुणे : Revenue Department Inspection Pune | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत (Mahayuti) कुरघोडीचे राजकारण सुरु झालेले आहे. महायुतीत अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष केले जात असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कुरघोडी सुरू केल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांची महसूल मंत्रालयातील विशेष निरीक्षण पथकाकडून तपासणी करण्याचा आदेश अचानक देण्यात आला आहे. संबंधित विशेष पथक पुण्यात दाखल झाले असून ही तपासणी १६ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक, पुणे शहर आणि ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व महसूल कार्यालयांची तपासणी होणार आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाचे सहायक संचालक रवींद्र खेडकर (Ravindra Khedkar) आणि सहायक लेखा अधिकारी जितेंद्र ढाकणे (Jeetendra Dhakane) यांचे मंत्रालयीन विशेष पथक पुण्यात दाखल झाले आहे.

या पथकाकडून महालेखापालांकडील अंतर्गत लेखापरीक्षण पथकाकडील प्रलंबित लेखा आक्षेप, प्रलंबित अपील प्रकरणे, प्रलंबित तपशीलवार देयके व इतर बाबींचा आढावा आणि पुनर्विलोकन होणार आहे.

रोकड पडताळणी, सर्व रोखवह्या, अखर्चित रक्कम गोषवारा, अद्ययावत बँक व्यवहारांच्या नोंदी, जमा खर्च ताळमेळची सद्य:स्थिती, सक्षम प्राधिकाऱ्यांनी वगळलेल्या किंवा अमान्य केलेल्या लेखा आक्षेपांचे पुनर्विलोकन, अफरातफर प्रकरणे, मुदतबाह्य प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित मोजणी प्रकरणे, वन गुन्हे, कायमस्वरुपी प्रमाणकांची प्रलंबित वसुली, महसूल जमा अभिलेखे व जमा चलने, जडसंग्रह नोंदवही आदींची अचानक तपासणी होणार आहे.

तपासणीवेळी ज्या कार्यालयांची माहिती पथकाला विनाविलंब होणार नाही, त्यांना संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाला सादर करावी लागेल. अन्यथा संबंधित माहिती महसूल सहसचिवांकडे मंत्रालयात समक्ष हजर राहून सादर करावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Revenue Department Inspection Pune)

या पथकाकडून तपासणी खालीलप्रमाणे होईल:

३० जुलै- पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त सर्व दस्त नोंदणी कार्यालये

३१ जुलै- मावळ, मुळशी

१ ऑगस्ट- खेड , राजगुरूनगर आणि आंबेगाव

२ ऑगस्ट- जुन्नर , उप वनसंरक्षक , जुन्नर (प्रादेशिक)

३ ऑगस्ट- उप वनसंरक्षक जुन्नर (प्रादेशिक)

५ ऑगस्ट- हवेली, पुणे शहर

६ ऑगस्ट- भोर, वेल्हे

७ ऑगस्ट- बारामती, इंदापूर

८ ऑगस्ट – दौंड, शिरूर

९ ऑगस्ट- सासवड, पुरंदर आणि उपविभागीय अधिकारी शिरूर आणि पुणे शहर

१२ ऑगस्ट- उप वनसंरक्षक, पुणे (प्रादेशिक/ वन्यजीव)

१३ ऑगस्ट- विभागीय वन अधिकारी, पुणे सामाजिक वनीकरण

१४ ऑगस्ट- जिल्हा अधीक्षक/ नगर भूमापन अधिकारी/ उपअधीक्षक भूमी अभिलेख

१६ ऑगस्ट- पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व इतर कार्यालये

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद