Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Rohit Pawar

कर्जत : Rohit Pawar NCP (SP) | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षाकडून सुरु झालेली आहे. मविआ विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला तर मविआ ला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले. लोकसभेला मिळालेल्या अपयशाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे मविआ नेही रणनीती आखत मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली आहे. (Rohit Pawar NCP (SP))

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

एमआयडीसीच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ” महाराष्ट्रात शरद पवार साहेब (Sharad Pawar), उद्धव ठाकरे साहेब (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्या एमआयडीसीच्या पेपरवर जर आताचे मंत्री सही करणार नसतील तर महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) आल्यानंतर पवार साहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची सही MIDC च्या कागदावर असू शकते,” असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्याचे बोलले जात आहे.

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळाही आयोजित
करण्यात आला होता. यावेळी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके,
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे
खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नारायण आबा पाटील (Narayan Aba Patil),
साहेबराव नाना दरेकर (Sahebrao Nana Darekar)यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

दरम्यान आमच्या पक्षाचे सर्व खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा संसदेतील आवाज बनून महाराष्ट्राचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्याचे काम करतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed