Rohit Pawar On BJP | ‘कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको’ अजित पवारांना ऑफर, रोहित पवारांचा दावा; म्हणाले – ” अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपात चलबिचल…”

Rohit Pawar-Ajit Pawar-Devendra Fadnavis

मुंबई : Rohit Pawar On BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी पक्षातील इच्छूक उमेदवार मतदारसंघात दौरे करत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्याही बैठका सुरु आहेत. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

दरम्यान शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवाच भाजपाचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यात अजित पवारांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे गटाला १७-२२ जागा आणि भाजपाला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपामध्ये भीती पसरली आहे, त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवारांनी ट्विटरवरून म्हंटले आहे की, भाजपाच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

त्याशिवाय कर्जत जामखेड (Karjat Jamkhed Assembly Constituency) संदर्भात
‘कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको’ असे सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि
तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून
या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील,
असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed