Rohit Pawar On Davos Tour | दावोस दौऱ्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा घणाघात; म्हणाले – ‘सरकारला खोटं पण रेटून बोलायची सवय, 61 पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच’

Rohit Pawar

पुणे : Rohit Pawar On Davos Tour | दावोस दौऱ्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दावोसमध्ये ९८ टक्के गुंतवणूकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्ये बघून आश्चर्य वाटत नाही, कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवयच असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

रोहित पवार म्हणाले, ” ६१ एमओयु पैकी ४५ एमओयु भारतातील कंपन्यांशीच झाले आहेत. या कंपन्यांनी ११,०२०४० कोटीचे करार म्हणजेच ७४ टक्के गुतंवणूक आपल्या देशातील कंपन्यांनीच केली. याहून विशेष म्हणजे देशातील कंपन्यांनी केलेल्या ४५ एमओयु पैकी ३६ एमओयु महाराष्ट्रातल्या कंपन्यांनीच केली आहे.

म्हणजे जवळपास १०,१३६४२ कोटीची म्हणजेच ६७ टक्के गुंतवणुकीचे करार हे राज्यातीलच आहेत. यामध्ये काही कंपन्या तर नरीमन पॉईंट भागातच आहेत. एका कंपनीने तर ३.०५ लाख कोटीचा एमओयु व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला. म्हणजे कंपनीचे प्रतिनिधी इकडे मुंबईत, मुख्यमंत्री तिकडे दावोसला असा मुंबई-दावोस दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सने करार केला.”

ते पुढे म्हणाले, ” सरकार दावोसला जाऊन अपयशी ठरले असे नाही, परंतु खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते? हा प्रश्न पडत आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील कंपन्यांशीच करार केले जात असतील तर मग दावोस जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ‘मॅग्नेस्टिक महाराष्ट्र’ सारख्या कार्यक्रमावर भर द्यायला हरकत नसावी”, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. (Rohit Pawar On Davos Tour)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed