Rohit Pawar On Pimpri-Bhosari Assembly | ‘आगे आगे देखो होता है क्या!’; पिंपरी, भोसरीतील राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत
पुणे : Rohit Pawar On Pimpri-Bhosari Assembly | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) अजित पवार गटात इन्कमिंग वाढलेले आहे. पिंपरी आणि भोसरीमध्ये २० तारखेला मोठा राजकीय बदल दिसणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झालेल्या आहेत.
शरद पवार गटामध्ये इनकमिंग वाढत चालल्याने पक्षात कॉन्फिडन्स वाढला आहे. ” पिंपरी भोसरीमध्ये २० तारखेला काय होतेय तुम्ही पहालच, आगे आगे देखो होता है क्या! असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर दिले आहे.
पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना एका मागून एक धक्का बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या सोबत असलेले अनेकजण शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत. काहींनी शरद पवार गटात प्रवेशही केलेला आहे. दरम्यान आता २० जुलै ला शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा होणार आहे.
अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनी अजित पवार यांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.
अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती,
त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती.
आता याच दारातून नाना काटे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यातच आता राजकीय उलथापालथीचे रोहित पवारांकडून संकेत देण्यात आले आहेत.
त्यामध्ये त्यांनी भोसरी आणि पिंपरी मतदारसंघाचा उल्लेख केल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?