Rohit Pawar | ‘इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये’, रोहित पवारांचा इशारा

नगर: Rohit Pawar | पुढील दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) पार पडणार आहेत. दरम्यान भेटीगाठी, मेळावे, सभांना वेग आला आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित असलेल्या कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सुरु आहे. यावरून रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
रोहित पवार म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या त्या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून उभा केल्या आहेत.
राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केलेला आहेत. त्याबाबत मी आता बोलणार नाही. मात्र, त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यांना दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी