Rohit R Patil On Ajit Pawar | आर. आर पाटलांनी केसाने गळा कापल्याच्या आरोपावर रोहित पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आबा ह्यात असते तर…’
सांगली: Rohit R Patil On Ajit Pawar | तासगाव-कवठे महांकाळ येथील एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहिती नव्हतं, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. या आरोपाला आता आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
” माझ्या वडिलांनी प्रामाणिकपणे काम केलं. गृहमंत्री असताना अतिशय पारदर्शकपणे पोलीस भरती करून घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत आबांनी चांगलं काम करून दाखवलं. अत्यंत सक्षमपणे गृहमंत्रीपद सांभाळल्यानंतर अशाप्रकारचा आरोप त्यांच्यावर होत असेल, तर ते दुर्दैवी आहे”, अशी खंत रोहित पाटील यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले,” आज अजित पवार जे काही बोलले ते मी एकलं. माझे वडील जाऊन आज नऊ वर्ष झाली आहेत. त्यानंतर दादांनी असं विधान केल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना दुःख झालं आहे. खरं तर त्यावेळी नेमकं काय घडलं असेल, याबाबत आम्ही आबा हयात नसताना उत्तरं देऊ शकत नाही. आबा गेले त्यावेळी माझं वय केवळ १५ वर्ष होतं. त्यामुळे तेव्हा काय घडलं असेल, याची कल्पना मला नाही. पण अजित पवारांच्या विधानाने दुःख नक्कीच होतं आहे “, असे रोहित पाटील यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, ” आज आबा जाऊन नऊ वर्ष झाली आहेत. आज ते हयात असते,
तर त्यांनी अजित पवारांच्या या आरोपाला उत्तर दिलं असतं.
पोलीस भरती असेल किंवा डान्सबारचा प्रश्न असेल, गृहमंत्री म्हणून आबांनी अतिशय पारदर्शीपणे काम केलं.
डान्सबारच्या वेळी तर त्यांना बऱ्याच ऑफर होत्या.
मात्र, त्यांनी महिलांची अब्रू वाचवण्याकरिता डान्सबार बंद करण्याचा निर्णय घेतला.
अशा व्यक्तीबद्दल असे आरोप करणं, तेही प्रचारसभेत, हे चुकीचं आहे.
तासगावात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची परिस्थिती काही चांगली नाही.
त्यामुळे अजित पवार अशाप्रकारचे आरोप करत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा