Rohit Sharma On Retirement | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माचा खुलासा; म्हणाला,…
दिल्ली : Rohit Sharma On Retirement | टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषकातील विजयानंतर विराट कोहलीने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार स्वीकारताना क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तर रोहित शर्माने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची माहिती दिली.
रोहित शर्माचे वय पाहता तो २०२७ च्या वर्ल्ड कप पर्यंत इतर दोन फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो अशी चर्चा होती. रोहित सध्या वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यापासून विश्रांतीवर आहे. श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेत देखील त्याला विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत रोहित शर्मा यानेच स्वतः खुलासा करत माहिती दिली आहे.
अमेरिकेत एका कार्यक्रमात त्याच्या रिटायरमेंट प्लॅनबाबत विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, मी इतका दूरचा विचार केलेला नाही. मात्र आणखी काही काळ मी खेळताना नक्की दिसेल असं रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी रोहितच्या कर्णधार पदावरून मोठे विधान केले होते. जय शाह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत जय शाह म्हणाले, “गेल्या एका वर्षात ही आमची तिसरी फायनल होती. जून २३ मध्ये आम्ही डब्ल्यूटीसीमध्ये हरलो. नोव्हेंबर २३ मध्ये आम्ही मने जिंकली पण चषक जिंकू शकलो नव्हतो.
पण मी राजकोटमध्ये म्हणालो होतो की, जून २०२४ मध्ये आम्ही हृदय आणि कप दोन्ही जिंकू
आणि आमच्या कर्णधाराने ते करून दाखवले आहे.
त्यामुळे आता पुढील WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे.
त्यामुळे मला खात्री आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात आम्ही पुढील या दोन्ही स्पर्धांमध्ये विजयी मिळवू”,
असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार