Rule Change From 1st August 2024 | 1 ऑगस्टपासून लागू होतील ‘हे’ 5 मोठे बदल, प्रत्येक घर आणि खिशावर होईल परिणाम!
नवी दिल्ली : Rule Change From 1st August 2024 | 1 ऑगस्टपासून देशात अनेक मोठे बदल दिसून येतील, जे थेट तुमच्या स्वयंपाक घरापासून तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमधील बदलांचा समावेश आहे. अशाच 5 मोठ्या बदलांबाबत जाणून घेऊया…
पहिला बदल : एलपीजीचे दर (LPG Gas Price)
ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करतात. त्यामुळे 1 ऑगस्ट 2024 ला सकाळी सहा वाजता सुधारित दर जारी होऊ शकतात. यावेळी घरगुती सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा लोकांना आहे.
दूसरा बदल – सीएनजी आणि पीएनजी दर (CNG-PNG Gas Price)
देशात पहिल्या तारखेला ऑईल मार्केटिंग कंपन्या हवाई इंधन म्हणजे एयर टर्बाईन फ्यूएल आणि सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल करतात. 1 ऑगस्टला त्याचे नवीन दर समोर येऊ शकतात.
तिसरा बदल – एचडीएफसी क्रेडिट कार्ड (HDFC Credit Card)
1 ऑगस्टपासून एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे रेंड पेमेंट थर्ड पार्टी अॅप क्रेड, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज अथवा अन्यवरून केल्यास त्या ट्रांजक्शनवर 1% चार्ज लावला जाईल आणि प्रति ट्रांजक्शन लिमिट 3,000 रुपये ठरले आहे. फ्युएल ट्रांजक्शनवर 15,000 रुपयापेक्षा कमीच्या व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही, मात्र 15,000 रुपयापेक्षा जास्तच्या व्यवहारावर एकूण रक्कमेवर 1% शुल्क लागेल. (Rule Change From 1st August 2024)
चौथा बदल – गुगल मॅपचा चार्ज (Google Map Charge)
1 ऑगस्ट 2024 पासून गुगल आपल्या गुगल मॅप सर्व्हिसवर भारतात घेतल्या जाणारे चार्जेस 70 टक्केपर्यंत कमी करणार आहे. याशिवाय आता गुगल आपल्या मॅप सर्व्हिसचे पेमेंट डॉलर ऐवजी भारतीय रुपयात सुद्धा घेईल.
पाचवा बदल – 13 दिवस बँक हॉलिडे (Bank Holidays)
ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि स्वतंत्र्य दिनासारख्या विविध कारणामुळे बँकांना सुट्टी असेल. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा सुद्धा समावेश आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश