Rule Changes | तुम्हाला सुद्धा Credit Card ची देय रक्कम भरायचीय? झालाय हा मोठा बदल… वाढू शकतात अडचणी, तुमची बँक बीबीपीएसवर रजिस्टर आहे का?

नवी दिल्ली : Rule Changes | भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल १ जुलै २०२४ पासून लागू झाला आहे. केंद्रीय बँकेने म्हटले की, थर्ड पार्टी अॅप्लीकेशनच्या माध्यमातून सर्व क्रेडिट कार्ड बिलांचा भरणा भारत बिल पेमेन्ट सिस्टम (BBPS) च्या माध्यमातून केला पाहिजे, ज्याचे व्यवस्थापन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे केले जात आहे. (Credit Card)
याचा अर्थ असा आहे की, प्रमुख बँका जसे की, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड होल्डर्स आपली देय रक्कम भरण्यासाठी थर्ड पार्टी अॅप CRED, PhonePe, Amazon Pay, Paytm चा वापर करू शकणार नाहीत. हा बदल बँकिंग संस्थांच्या भारत बिल पेमेंट सिस्टम प्लॅटफॉर्मसोबत रजिस्टर्ड न झाल्याने झाला आहे. (Rule Changes)
या बँकांच्या कस्टमर्सला नाही कोणतीही अडचण
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडौदा, कोटक महिंद्रा बँक आणि इतर प्रमुख बँकांचे क्रेडिट कार्ड असलेल्या व्यक्तींसाठी चिंतेची कोणतीही गोष्ट नाही. या बँकांनी भारत बिल पेमेंट प्रणालीसोबत रजिस्टर्ड केले आहे, ज्यामुळे कस्टमर्स आपल्या पेमेंट गरजांसाठी थर्ड-पार्टी अॅप सहज वापरू शकतील.
या बँका बीबीपीएसवर रजिस्टर्ड
एसबीआय, कोटक बँक, इन्डसइंड बँक, आयडीबीआय बँक, एयू स्मॉल फायनान्स,
कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, यूनियन बँक,
पंजाब नॅशनल बँक आणि सारस्वत बँक बीबीपीएसवर रजिस्टर्ड आहेत.
तर रजिस्टर्डवर सध्या काम करत असलेल्या बँक- अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक,
आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि येस बँक इत्यादी आहेत.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर