Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील मजूकर; दोघांना अटक

Rupali Chakankar

पुणे : Rupali Chakankar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या (Ajit Pawar NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या वतीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या ३२ जणांची लिस्ट सायबर क्राईमला (Cyber Crime) देण्यात आली होती. त्यानुसार ठाणे पोलिसांच्या (Thane Police) सायबर क्राईम विभागाने सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

अटक केलेल्या दोघांवर कलम ७२/ २०२४, कलम ३५४ ड, ५०९, ३४ या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. सन्नी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे.

याआधीही चाकणकर यांच्यावर समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय ३४. रा. रहाटी, ता.जि.परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला.
त्याला सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली होती.
तसेच प्रदीप कणसे यानेही अश्लील भाषेत समाजमाध्यमात कमेंट केल्याने त्यालाही नोटीस देण्यात आली होती. (Rupali Chakankar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | शिंदे गटाकडूनही 25 उमेदवारांची नावे फायनल; पक्षातील बड्या नेत्याने दिली माहिती

Actress Sonali Kulkarni At Bhau Rangari Ganpati | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

DCP R Raja At Bhau Rangari Ganpati | पुणे: पोलीस उपायुक्त आर राजा यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed