Rupali Chakankar | जळगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी अभियानाचे आयोजन

जळगाव : Rupali Chakankar | जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात (Jalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज ‘स्वाक्षरी अभियान’ (Signature Campaign) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि स्थानीक पदाधीकारी उपस्थित होते. यावेळी हजारो लोकांनी पांढऱ्या कॅनव्हासवर स्वाक्षरी केली, ज्यावर – ‘माझी लाडकी बहीण योजनेला माझा पाठिंबा आहे आणि ती पुढील ५ वर्षे सुरू राहावी अशी माझी इच्छा आहे.” असा मजकूर लिहीला होता.
जळगाव शहरातील लोकेश टॉवर (Lokesh Tower Chowk Jalgaon) चौक येथे महिला शहर अध्यक्षा मिनल पाटील (Minal Patil) यांनी आज माझी लाडकी बहीण ‘स्वाक्षरी अभियान’ कार्यक्रम आयोजित केला होता. ज़िल्हाध्यक्ष संजय पवार, महिला ज़िल्हाध्यक्ष कल्पना पाटील, शहर अध्यक्ष अभिषेक पाटील, ज़िल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, युवती ज़िल्हाध्यक्ष मोनालिका पवार, युवती कार्याद्यक्ष स्वाती पवार, अंमळनेर तालुका अध्यक्ष मंदाकिनी भामरे, महिला निरीक्षक अस्विनी मोगल, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांसह पदाधीकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आणि महिला संघटनांसह सर्व आघाडीच्या संघटना मतदारांशी जोडण्यासाठी अनेक अनोखे उपक्रम राबवत आहेत. युवा नेते सूरज चव्हाण यांनी राज्यातील विविध मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
पक्षाची विद्यार्थी संघटना, सांस्कृतिक शाखा, सामाजिक न्याय शाखा आणि अल्पसंख्याक शाखा यांसह इतर आघाडीच्या संघटनाही राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघात या अभियानाचं आयोजन करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा