Rupali Patil Thombare | रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा; म्हणाल्या – ‘तुमच्या बापाचं राज्य नाही, मर्दानगी तुमच्या घरी दाखवा’;

Rupali Patil Thombare

पुणे : Rupali Patil Thombare | मनसे (MNS) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) वाद चांगलाच वाढला आहे. अजित पवार पुण्यात नसतानाही धरणात पाणी कसं वाढलं, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला होता. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारी बहाद्दर असल्याचा पलटवार केला. (Rupali Patil Thombare)

त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. यावेळी त्यांच्यात बाचाबाचीही झाली. त्यानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील संघर्ष वाढल्याचे दिसत आहे. त्याचे पडसाद पुण्यात उमटले आहेत.

पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी पुण्यात आल्यावर मारू असा इशारा दिला होता. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देत तुमच्या बापाचं राज्य नाही. हा गुन्हेगारीचा आखाडा नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, असे म्हणत मनसे पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, राजकारणात विकासाबद्दल बोलायला पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको. तुमची मर्दानगी तुमच्या घरी दाखवा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरावी. आंदोलन जनतेच्या विकासासाठी करा, जनतेच्या कामासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावा.

पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली (Pune Flood). राज साहेब पुण्यात आले. राज ठाकरेंनी आमच्या नेत्यांवर टीका केली. राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर, राष्ट्रवादीकडून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले. राजकारणाचा दर्जा इतका खाली आलाय की, प्रत्युत्तर दिलं म्हणून डायरेक्ट हाणामारीची भाषा केली गेली.

मनसेच्या लोकांनी आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली.
गाडी फोडल्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मनसेच्या एका कार्यकर्त्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. विचारांची लढाई झाली पाहिजे,
टीका करताय तर प्रत्युत्तर सहन करायची तुमची तयारी पाहिजे, असा इशारा रुपाली पाटील यांनी यावेळी दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली