Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’
मुंबई: Sachin Waze On Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे’, असा आरोप त्यांनी केला आहे. (Sachin Waze On Anil Deshmukh)
१०० कोटींचे खंडणी प्रकरण आणि २०२१ च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मात्र, आता सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंना रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हे गंभीर आरोप केले आहेत.
सचिन वाझे म्हणाले, “सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे”, असे वाझे यांनी सांगितलं.
दरम्यान, सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ते काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र
ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या
अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे,
त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.
तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?