Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना

Sadashiv Peth Pune Fire News

पुणे : Sadashiv Peth Pune Fire News | सदाशिव पेठेतील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्याला आग लागली होती. घरात अडकलेल्या लॅब्राडोर जातीच्या श्वानाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली.

सदाशिव पेठेतील रमेश डाइंग या दुकानाजवळील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील घरात रात्री पावणेनऊ वाजता आग लागली. घरातील बेडरुमला आग लागली होती. आगीत गादी व इतर साहित्य जळून खाक झाले. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने घरातील १२ वर्षाचे श्वान आत अडकले होते. जवानांनी ब्रिदिंग एपरेटस सेट घालून आत प्रवेश करुन त्याला चादरीमध्ये घेऊन सुखरुप बाहेर काढले. आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझवली. धूर बाहेर जाण्याकरीता एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर केला. आग नेमकी कशामुळे लागली समजू शकले नाही. आगीत कोणीही जखमी नाही. (Sadashiv Peth Pune Fire News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed