Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

women-dead-body

पुणे : Sahakar Nagar Pune Accident News | पुण्यात लग्नाला आल्यानंतर घरी परत जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसने धडक दिल्याने त्यात एका महिलेचा मृत्यु झाला तर मुलगी जखमी झाली आहे. (Pune Satara Road)

आशाबाई दत्तात्रय सांळुके (वय ५७, रा. शुक्रवार पेठ, टिळक रोड) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विशाल दत्तात्रय सांळुके (वय ३८, रा. टिळक रोड, शुक्रवार पेठ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिश राजाराम गोरे (वय ३४, रा. राठवडे, कोंढणपूर) या बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील नातुबाग चौकात (Natubaug Chowk Sahakar Nagar) शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सर्व नातेवाईक मोरे यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. लग्न लागल्यानंतर रात्री ते सर्व जण घरी जाण्यासाठी निघाले. फिर्यादींची आई आशाबाई व मुलगी ही रिक्षाने बालाजीनगर येथे जाण्याकरीत रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी स्वारगेटच्या दिशेने येणारी एक पीएमपी बस बीआरटीमधून आली. कात्रजकडे भरधाव जाणार्‍या बसने आशाबाई व फिर्यादीची मुलगी प्रचिती यांना धडक दिली. त्यात फिर्यादीची आई आशाबाई सांळुके यांचा मृत्यु झाला तर मुलगी प्रचिती ही जखमी झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख (PSI Firoj Shaikh) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट