Sahakar Nagar Pune Crime News | कुत्र्याला मारु नका सांगितल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

marhan

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | लहान मुलगा कुत्र्याला दगड मारत असल्याने त्याला दगड मारु नको, असे सांगितल्याने त्यांच्या मोठ्या भावाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले. (Attempt To Murder)

याबाबत अथर्व शिवराज लोखंडे (वय १९, रा. तळजाई माता वसाहत, पदमावती) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता आडगळे (रा. तळजाई माता वसाहत, पदमावती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई माता वसाहतीतील विनायक हॉटेल चौकात २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्याकडे कुत्रा आहे. त्याला फिरायला घेऊन गेला असताना दत्ता आडगळे याच्या लहान भावाने कुत्र्याला मारले होते. फिर्यादी विनायक हॉटेल चौकात थांबला असताना दत्ता आडगळे आला व त्याने फिर्यादीला तु माझ्या लहान भावास काय बोललास, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी याने तुझ्या भावाने माझ्या कुत्र्याला मारल्याने, कुत्र्याला मारु नको, असे समजावून सांगत होते,असे सांगितले. पण दत्ता याने काहीही एक न ऐकता फिर्यादीला धक्का देऊन हाताने मारहाण केली. त्याच्या पासून बचावासाठी फिर्यादी पळून जाऊ लागला. तेव्हा दत्ताने त्याला पकडून तेथे पडलेला दगड डोक्यात घालून फिर्यादीला जबर जखमी केले. हवालदार संतोष जोशी (Santosh Joshi Police) तपास करीत आहेत. (Sahakar Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी

Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा; सुनील माने यांचे सह पोलीस आयुक्तांना निवेदन

Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग

Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण