Sahakar Nagar Pune Crime News | माचिस दिल्यानंतर बाहेर जाण्यास सांगितल्याने टोळक्याने केली बार कॅशिअरला बेदम मारहाण
पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | बार बंद झाल्यावर कामगार जेवायला बसले होते. तेव्हा एक जण बेसमेंटमधील दरवाजाने आत आला. माचिस मागितले, माचिस दिल्यानंतर त्याला कॅशिअरने जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने इतरांना बोलावून त्याने कॅशिअरला बेदम (Marhan) मारहाण केली.
या घटनेत बार कॅशिअर लेलिन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोडविण्यास आलेल्या फिर्यादी अरविंद लज्जाराम यादव (वय १९, रा. मधुशाला बारच्या मागे, पतंग प्लाजा, धनकवडी) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) प्रफ्फुल रणसिंग (वय २६), रंणजित ऊर्फ पितांबर घोडके (वय २५), कृष्णा सपकाळ (वय २६), गजानन असलकर (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे सातारा रोडवरील चैतन्यनगरमधील मधुशाला बारमध्ये रविवारी रात्री साडेबारा वाजता घडली. (Sahakar Nagar Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार बंद केल्यावर फिर्यादी व त्यांचे सहकारी आतमध्ये जेवण करीत होते.
या वेळी प्रफ्फुल रणसिंग हा मागील बेसमेंटमधील असलेल्या गेट उघडून मागील रस्त्याने बारमध्ये आला.
त्याने माचिस मागितली. त्याला माचिस दिल्यानंतर बाहेर जाण्यास सांगितले.
त्या रागातून त्याने कॅशिअर लेलिन यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली.
त्याने फोन करुन रणजित घोडके याला व इतरांना बोलावून घेतले. चौघे जण बार मध्ये आले.
त्यांनी भंगारमध्ये ठेवलेल्या बॉटल्या घेऊन त्याने कॅशिअर लेलिन याच्या डोक्यात,
पाठीत मारुन तसेच बसेमेंटमधील खुर्ची डोक्यात मारली.
त्या खुर्चीच्या लोखंडी पायाने पाठीत मारुन गंभीर जखमी केले.
हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असताना त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलीस उपनिरीक्षक पोठरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर