Sahakar Nagar Pune Crime News | शारिरीक संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; पोक्सो अंतर्गत तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | अल्पवयीन मुलीला घरी बोलावून शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याने त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) तरुणावर पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.
सुरज विकी गायकवाड Suraj Vicky Gaikwad (रा. तानाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची इंस्टाग्रामवरुन ओळख झाली. काही दिवसांनी त्यांचे प्रेमात रुपांतर झाले. फिर्यादी या कॉलेजला गेल्या असताना सुरज याने तिला फोन करुन आपल्या धनकवडी येथील घरी बोलावले. (Sahakar Nagar Pune Crime News)
तिच्यासोबत शारिरीक संबंध केले. त्यानंतर तिला तळजाईला फिरायला नेले.
तेथून परत घरी आल्यावर पुन्हा शारिरीक संबंध केले. त्यामुळे फिर्यादी या गर्भवती राहिल्या.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर फिर्यादी या १७ ते १९ आठवड्याच्या गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद