Sahakar Nagar Pune Crime | पुणे : पत्नीचा खून करुन रचला बनाव, पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या
पुणे : Sahakar Nagar Pune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts On Wife Character) घेऊन तिचा गळा आवळून खून केला (Murder In Sahakar Nagar Pune). त्यानंतर तिला लटवकून गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहकरारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) आरोपी पतीला गुरुवारी (दि.11) रात्री अटक केली आहे. हा प्रकार 6 जुलै रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथे घडला होता.
अंजली स्वप्नील मोऱे उर्फ अंजना बापु खंडाळे (वय-29 रा. पांचाळ वस्ती, चव्हाणनगर, धनकवडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंजलीचा पती स्वप्नील शिवराम मोरे (वय-30 रा. घोरपडी पेठ, पीएमसी कॉलनी, पुणे) याच्यावर भान्यासं 103(1) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली मोरे या विवाहितेने 6 जुलै रोजी चव्हाणनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, गळ्यावरील वण पाहून पोलिसांना संशय आला. तसेच शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यावरुन आरोपीला गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
आरोपी पेंटरचे काम करतो. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता.
यातून त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या दिवशी पत्नी बाहेर गेली होती.
त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला.
त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला.
मात्र, पोलिसांनी केलेल्या तपास खून असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीला गुरुवारी रात्री अटक केली. पुढील तपास पीएसआय युवराज पोठरे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड