Sainath Babar-Hadapsar Assembly | पुण्यात मनसेकडून साईनाथ बाबर हडपसरच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार

Sainath Babar-Raj Thackeray (1)

पुणे : Sainath Babar-Hadapsar Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपला बिनशर्त (BJP) पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी (Mahayuti Candidate) राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena – MNS) घेतला आहे.

मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी थेट हडपसर मतदारसंघावर दावा ठोकला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आता मनसेकडून बाबर हडपसरच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. याबाबत साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवत सुरु असलेल्या चर्चेला दुजोरा दिला आहे. वसंत मोरेंनी मनसेला रामराम करत वंचित बहुजन आघाडीतुन (Vanchit Bahujan Aghadi – VBA) लोकसभेचे तिकीट मिळवले.

त्यात मोरे पुणेकरांच्या पसंतीस उतरले नाहीत. त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) यांची मशाल हाती घेतली. आता ठाकरे गटाकडून मोरे हडपसर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे आता बाबर आणि मोरे यांच्यात सामना रंगणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय