Samvidhan Diwas In SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
पुणे : Samvidhan Diwas In SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठात संविधान दिन मोठ्या दिमाखात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळील संविधान स्तंभाजवळ माननीय कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संगीता जगताप, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.अभिजीत कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे यांसह उपस्थित विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
त्यानंतर संविधान जनजागृतीसाठी विद्यापीठामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे पोषाख परिधान केले होते. यावेळी संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली. यामध्ये संविधानाची उद्देशिका, संविधानाने माणसांना दिलेले हक्क याविषयी भाष्य केले.
त्यानंतर सकाळी ११ वाजता संविधानाचे अभ्यासक तथा कायदा आयोगाचे सदस्य डॉ. डी. एन. संदानशिव यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीतील महत्त्वाच्या नोंदी, जगातील इतर देशांचे संविधान आणि भारतीय संविधान त्याचे वेगळेपण अशा विविध आणि महत्त्वपूर्ण घटना त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तारुण्यात संविधान समजून घेण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सदानंद भोसले यांनी केले तर आभार डॉ. सुधाकर बोकेफोडे यांनी मानले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार