Sandeep Khardekar | पतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबा ! हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक- संदीप खर्डेकर

Sandeep Khardekar

कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार- श्रीकांत शिळीमकर

पुणे : Sandeep Khardekar | हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला (Mahayuti) विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे Patit Pavan Sanghatana (PPS) माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले. कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार, असा निर्धार पतितपावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर (Shrikant Shilimkar) यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil), भाजप महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,शहर पालक मनोज नायर,जालिंदर टेमगिरे,सुनील मराठे,ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्या सह पतितपावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्याने आज एक महत्वाचा वक्फ सारखा कायदा मागे घेऊन संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठववा लागला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी पराभूत व्हावे लागले. मविआ सरकारने अडीच वर्षे हिंदुंना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही गाफील राहू नये; हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीचे सरकार आणावं लागेल. अशी भावना व्यक्त केली.

श्रीकांत शिळीमकर म्हणाले की, पतितपावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे.
त्यामुळे हिंदुत्वासाठी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच; कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील
यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला. (Sandeep Khardekar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed