Sangamner Assembly Election 2024 | बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; कार्यकर्त्यांकडून गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ

संगमनेर : Sangamner Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आपल्या कन्येला समजवा.. . नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणतात. पण सुजय दादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे, असं वक्तव्य वसंत देशमुख यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.
वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. काल रात्री याठिकाणी जाळपोळच्या घटना पाहावयास मिळाल्या. दरम्यान आता तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. धांदरफळ गावामध्ये काल रात्री मोठा गोंधळ झाल्यानंतर सभा स्थळावरील सुजय विखे पाटलांच्या युवा संकल्प मेळाव्याचे बँनर थोरात समर्थकांकडून निषेध करत फाडले गेले. तसेच वक्तव्याचा निषेध करत धांदरफळ गाव बंद ठेवण्यात आलं आहे.
देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रात्री आक्रमक झाल्याचे दिसले. सभेनंतर विखे यांच्याबरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली.
सभेचे आयोजक व संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी,
या मागणीसाठी मध्यरात्रीनंतरही हजारोंचा जमाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देऊन बसला होता.
दरम्यान आजही देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली
जात असल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. (Sangamner Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण