Sangli Accident | सांगलीत भीषण ‘हिट अँड रन’! जवळपास 15 जखमी, मद्यधुंद इनोव्हा चालकाचा धिंगाणा

Pune Baner Accident News | Baner (Pune): Delivery boy dies after school bus hits tractor trolley while trying to overtake, trolley flies off and falls on motorcycle (Video)

सांगली : Sangli Accident | सांगली शहरात मद्यधुंद वाहनचालकाच्या बेदरकारपणामुळे भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली असून, इनोव्हा कारने धुमाकूळ घालत रस्त्यावरील पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहतूक पोलिसांना चिरडल्याने किमान १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री उशिरा शहरातील वर्दळीच्या परिसरात घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हा कार वेगाने पुढे धावली आणि एकामागून एक अनेकांना जोरदार धडक दिली. या अपघातात काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. अपघात पाहणाऱ्या संतप्त नागरिकांनी इनोव्हा कार अडवून तिची तोडफोड केली, तसेच मद्यधुंद चालकाला गाडीबाहेर काढून मारहाणही केली. या मारहाणीत चालकही जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा बंदोबस्त तैनात केला.

पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालकाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, अपघाताच्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगली शहरात संतापाची लाट उसळली असून, मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्ते अपघातांमागे दारू पिऊन वाहन चालवण्याचे वाढते प्रकार पुन्हा एकदा समोर आले असून, निष्काळजी वाहनचालन किती जीवघेणे ठरू शकते याचे भयावह उदाहरण या घटनेतून समोर आले आहे.

You may have missed