Sangli Crime News | भरदिवसा माजी सरपंचाची गळा चिरून हत्या; परिसरात खळबळ
सांगली : Sangli Crime News | भरदिवसा माजी सरपंचाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सांगलीतील घानवड ता. खानापूर येथील माजी उपसरपंच बापूराव चव्हाण गार्डी नेवरी रस्त्यावरून जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. (Sarpanch Murder Case)
चव्हाण हे पोल्ट्रीचा तसेच सराफ व्यवसायही करत होते. काल दुपारी ते घानवड येथून गार्डी-नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेट वरून निघाले होते. ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अनोळखी व्यक्तीने खून केला.
बापूराव चव्हाण यांच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. खून करून पसार झालेल्या हल्लेखोरांचा विटा पोलीस शोध घेत आहेत. (Sangli Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या