Sangli Crime News | लग्नाळू पोरांना गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद; खोटे लग्न करत उकळले पैसे
सांगली : Sangli Crime News | खोटं लग्न करून गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पहिले लग्न झालेले असताना कोल्हापूर येथील एका विवाहितेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले. त्यासाठी स्वतःचे नावही बदलले. खोटे लग्न करून पतीला दीड लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणींची टोळी जेरबंद केली आहे.
पल्लवी मंदार कदम (मूळ नाव- परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट राणी ऊर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा.पंचशील नगर), राधिका रतन लोंढे (रा. लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. फसवणुकीची घटना ९ सप्टेंबर २०२४ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण खासगी नोकरी करतो. संशयित चार महिलांसह नाईकबाई नावाच्या आणखी एका महिलेने संगनमत करून पल्लवी कदम ऊर्फ परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असतानाही या तरुणाशी दुसरे लग्न लावून दिले.
याकरिता तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले. ते संशयितांनी वाटून घेतले.
पल्लवीचा पती मंदार जिवंत असताना तसेच तिचा धर्मही संशयितांनी लपवून ठेवला.
काही दिवसांनी तरुणाला या टोळीच्या कारनाम्याची माहिती मिळाली.
त्याने संजयनगर पोलिस ठाण्यात टोळीविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Sangli Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन