Sangli Crime News | शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू ; तळ्याजवळ खेळत असताना घडली दुर्घटना

Sangli Crime News

सांगली : Sangli Crime News | लोणारवाडी (Lonarwadi) येथील शेततळ्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू (Two Children Died After Falling Into a Llake) झाल्याची घटना शुक्रवार (दि.६) घडली. श्रद्धा सिद्धनाथ बजबळे Shraddha Siddhanath Bajbale (वय ६ वर्षे) व संकेत विलास बजबळे Sanket Vilas Bajbale (रा.लोणारवाडी, ता. कवठेमंकाळ जि. सांगली) अशी मृत बालकांची नावे आहेत. याप्रकरणी कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात (Kavthe Mahakal Police Station) नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणारवाडी येथे या बालकांच्या घराजवळ शेततळे आहे. या शेततळ्याजवळ श्रद्धा व संकेत दोघेजण खेळत होते. दरम्यान तळ्याजवळ खेळत असताना तोल जाऊन दोघेही तळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना (दि.६) दुपारी उघडकीस आली. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून मृत बालकांचे रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Sangli Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये

Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या

You may have missed