Sangli Flood – Irwin Bridge | परंपरा जपत असल्याचं सांगत दोन तरूणांची ‘आयर्विन’ पुलावरून कृष्णा नदीत उडी; NDRF च्या टीमनं दोघांना वाचवलं
ऑनलाइन टीम – Sangli Flood – Irwin Bridge | दोन तरूणांनी सांगलीतील ‘आयर्विन’ पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारली. सुदैवाने एनडीआरएफच्या टीमला दोघांना वाचवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सांगली, सातारा, कोल्हापुर या भागात जोरादार पाऊस झाल्यानंतर कोयना धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी सांगलीत पूरस्थिती निर्माण होत असते. या पूरस्थितीत नागरिकांना वाचवता यावे त्यामुळे इथले तरूण अथांग वाहणार्या कृष्णा नदीत उड्या मारून पोहण्याचा सराव करतात. पुरात पोहणं, होड्या चालवणं याला येथील तरूण परंपरा मानतात. हिच परंपरा जपण्याच्या भावनेने दोन तरूणांनी पुलावरून नदीत उडी मारली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते वाहून जात होते. पण नदीतील एका पोलचा त्यांनी आधार घेतला. त्यानंतर नदी काठच्या नागरिकांनी आणि एनडीआरएफच्या टीमंन दोघांना वाचवलं. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही स्टंटबाजी नसून परंपरा
सांगलीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबचे अॅड. अमोल बोळाज यांनी म्हंटले आहे
की, कृष्णा नदीच्या पात्रात पोहणे हे सांगलीतील तरूणांचे स्वप्न असते.
पुराच्या पाण्यात पोहण्याचा सराव झाल्यामुळे पूरस्थितीत नागरिकांना वाचवणे सोपे जाते.
परंपरा जपणं आमचं कर्तव्य आहे.
ती जर जपली तसती तर, 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरात सांगलीकरांचे जीव वाचवता आले नसते.
तसेच प्रशासनाला मदत करता आली नसती. त्यामुळे सर्वांनी ही गाष्ट लक्षात घेऊन परंपरा जपली पाहिजे.
वाढवली पाहिजे. जर ही परंपरा नष्ट झाली तर भविष्यात आपल्याला दुसर्या मदतीवर अवलंबून राहावे लागेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता