Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पिंपरी : Sangvi Pune Crime News | सांगवी येथे रस्त्यावर पार्क केलेल्या १४ वाहनांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्यांची तोडफोड करणार्या दोघा गुंडांनी एकाचा पत्ता सांगितला नाही तसेच गाड्या फोडताना पाहिले म्हणून गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नवी सांगवीमधील कवडेनगरमध्ये (Kawade Nagar Pimple Gurav) रविवारी पहाटे ४ वाजता घडला.
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) शशिकांत दादाराव बनसोडे (वय २४, रा. रहाटणी), प्रथमेश अरुण इंगळे (वय १८, रा. रामनगर, रहाटणी) यांना अटक केली आहे. या घटनेत राजेश किसन झांबरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. (Attempt To Murder)
याबाबत किसन इंदरराव झांबरे (वय ५५, रा. कवडेनगर, सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शशिकांत बनसोडे व प्रथमेश इंगळे यांनी दहशत पसरविण्यासाठी रोडच्या कडेला पार्क केलेल्या १४ गाड्यावर कोयत्याने वार करुन त्यांची तोडफोड केली.
ते ही तोडफोड करत असताना राजेश झांबरे याने पाहिले. हे पाहून ते दोघे त्याच्याजवळ आले. त्यांनी लाला पाटील यांचा पत्ता विचारला. पण, राजेश यांनी त्यांना पत्ता सांगितला नाही. तसेच कारच्या काचा फोडताना पाहिले असल्याचे त्याचा राग मनामध्ये धरुन त्यांनी राजेश यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक कलकुटगे तपास करीत आहेत. (Sangvi Pune Crime News)
पिंपरी चिंचवड परिसरातील एक वेगळा व्हिडिओ पहा –
https://www.instagram.com/reel/DAAfSU_pxJC/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली