Sanjana Jatav | संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या पतीवर; ‘पीएसओ’ पती असलेल्या एकमेव खासदार

Sanjana Jatav

राजस्थान : Sanjana Jatav | भरतपूर येथील काँग्रेस खासदार संजना जाटव या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी संजना जावट आपल्या पतीमुळं चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या पतीवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं संजना जाटव या पहिल्या खासदार ठरल्या आहेत, ज्यांच्या सुरक्षेत त्यांचा पती तैनात करण्यात आला आहे.

संजना जाटव यांनी गेल्या २० दिवसांपूर्वी आपला पती कप्तान सिंह यांची वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) म्हणून शिफारस केली होती. या शिफारसीनंतर आता अलवरचे एसपी आनंद यांनी आदेश जारी केले आहेत. संजना यांचे पती कप्तान सिंह राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून आता ते भरतपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संजना जाटव यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

युवा महिला उमेदवारांमध्ये संजना जाटव यांचा समावेश आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्या भरतपूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. संजना जाटव या काँग्रेससोबत ‘लडकी हूं लड सकती हूं’ मोहिमेत सामील झाल्या होत्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed