Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

sanjay rathod

मुंबई : Sanjay Rathod News | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संजय राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याच ट्रस्टला नवी मुंबईत भूखंड (CIDCO Allotted Navi Mumbai Land Case) मिळवून दिल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते (Shivsena Shinde Group) आणि मंत्री संजय राठोड यांनी सिडकोला नोव्हेंबर २०२३ मध्ये नवी मुंबईतील एक जमीन राज्य सरकारला त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टला द्यायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ओबीसींमध्ये येणाऱ्या बंजारा समाजासाठीच्या कम्युनिटी सेंटरसाठी ही जमीन देण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे. अखिल भारतीय बंजारा सेवा संघाकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये या कम्युनिटी सेंटरची पहिल्यांदा मागणी करण्यात आली.

दरम्यान बंजारा समाजाच्या या संघटनेकडून मागणी झाल्यानंतर वर्षभरातनंतर राज्य सरकारकडून ५,६०० चौरस मीटरचा भूखंड श्री संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या संजय राठोड यांच्या ट्रस्टला देण्यात आला.

कम्युनिटी सेंटरसाठी सिडकोने तीन जमीनीचे पर्याय निश्चित केले होते.
दरम्यान यवतमाळचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी या प्रकरणात पुढाकार घेत यातील एक जमीन त्यांच्या AIBSS या ट्रस्टसाठी निश्चित केली.

या सेंटरसाठी जमीन निश्चित करण्याची जबाबदारी सिडकोकडे सोपवण्यात आली होती.
दरम्यान मी जमीन परत करण्यास तयार असून इतर कोणतीही इच्छुक संस्था कम्युनिटी सेंटर बांधण्यासाठी पुढे येऊ शकते
असे राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जमीन मिळवण्यात आपले कोणतेही हितसंबंध नव्हते कारण ती जमीन सामाजिक कारणासाठी होती,
नफा मिळविण्यासाठी नव्हती. कम्युनिटी सेंटर बांधण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक संस्थांपैकी
आमची एक संस्था होती असेही त्यांनी सांगितले. (Sanjay Rathod News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी

Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा; सुनील माने यांचे सह पोलीस आयुक्तांना निवेदन

Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग

Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण