Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana | ‘1500 रुपयांनी काय होते? मुख्यमंत्र्यांचे घर 1500 रुपयांत चालेल का?’, लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढण्याची संजय राऊतांची मागणी

sanjay raut eknath shinde (1)

मुंबई : Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना सुरु केली. यानंतर लाडक्या भावांसाठी महत्त्वाची घोषणा केली. पंढरपुर येथे शासकीय महापूजेनंतर (Pandharpur Mahapuja) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘लाडका भाऊ योजना’ (Ladka Bhau Yojana) सुरु करणार असल्याची घोषणा केली. या योजनेतून बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला असल्याचे त्यांनी म्हटले. या योजनेवरुन उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केली आहे.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. यावरुन संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दहा हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात स्त्री-पुरुष समानता आहे हे दाखवून द्या, असंही राऊत यांनी म्हटलं. (Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana)

संजय राऊत म्हणाले, पैशाची खरी गरज लाडक्या बहिणीला आहे. कारण ती घर चालवते. पण घरात भाऊ, नवरा बेरोजगार कारण नोकऱ्या नाहीत. दोन हजार जागांसाठी 25 हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली होती. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावर दहा हजार रुपये टाका.
1500 रुपयांनी काय होते? मुख्यमंत्र्यांचे घर 1500 रुपयात चालेल का? लाडक्या बहिणीवर मुख्यमंत्री अन्याय का करत आहेत.
लाडक्या बहीण भावाला 10 हजार रुपये द्या. स्त्री-पुरुष समानता आहे
हे महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed