Sanjay Raut On Sharad Pawar NCP | संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले – ”अजितदादांना सोडून सर्वांना शरद पवार परत घेऊ शकतात”
मुंबई : Sanjay Raut On Sharad Pawar NCP | जे-जे पक्ष सोडून गेले, त्यांचा आम्ही निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्याशी चर्चा केली, तसेच जेव्हा-जेव्हा शरद पवारांची विधाने ऐकली, तेव्हा त्यांचे हेच म्हणणे आहे की, अजित पवार सोडून बाकीच्या सर्वांना ते परत घेऊ शकतात. मात्र, अजित पवारांना (Ajit Pawar NCP) नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी बारामतीमधून न लढण्याच्या दिलेल्या संकेतावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, अजित पवारांना बारामतीत आता रस राहिला नाही. कारण बारामतीमधील लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा रस पिळून काढला आहे. त्यामुळे ते पुतण्याच्या विरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघामधून (Jamkhed Assembly Election) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी ते त्यांच्या घरातील व्यक्तीच्या विरोधातच लढतील, असे राऊत म्हणाले. (Maharashtra Assembly Election 2024)
संजय राऊत म्हणाले, लोकसभेचे निकाल महविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने लागले. आगामी विधानसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिवसेना प्रमुख दोन दिवस दिल्लीत होते. शरद पवार, राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत बैठका झाल्या, अशी माहिती राऊत यांनी दिली. (Sanjay Raut On Sharad Pawar NCP)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन