Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा
मुंबई : Sanjay Raut On Sharad Pawar | छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation Issue) मुद्द्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं . राज्यातले एक जेष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करीत आहेत असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केला.
“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचे तर्कवितर्क काढले जात आहेत. या विषयावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचावरचे कलाकार असल्याचे ते म्हणाले. (Sanjay Raut On Sharad Pawar)
संजय राऊत म्हणाले, ” छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे.
खूप वेळा आपले रंग रुप बदलून नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत.
भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले? त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला, हे सर्वांना माहीत आहेच.
पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे.
त्यामुळे पुढे काय होईल, हे सर्वांनी पाहावे. महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता.
छगन भुजबळ सारखे लोक याच फिरता रंगमंचाचे कलाकार आहेत. ते इकडून तिकडे फिरत असतात.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन