Sanjay Raut | पेट्रोल, डिझेल दर 50 रूपये करावे आणि सिलेंडर 400 ने कमी करावा; खासदार संजय राऊत यांची सरकारकडे मागणी

Sanjay-Raut

मुंबई : Sanjay Raut | पेट्रोल आणि डिझेलचे दर ५० रूपये आणि सिलेंडर ४०० रूपयाने कमी करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जागतिक बाजारात झालेली पडझड पाहता आता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मागणी केली. तर घरगुती सिलेंडर ५० रूपयांनी महागल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

खासदार राऊत म्हणाले की, एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरत असतील, तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे. जर ते मिळत नसतील, तर भारतासारख्या देशात अर्थमंत्री निर्मला सीतारामन महागाईत तेल ओतण्याचे काम करत आहेत. सिलेंडरमध्ये ५० रूपयांनी वाढ झाल्याने लाडक्या बहिणींचे बजेट परत कोलमडले. माझे आवाहन आहे की, स्मृती इराणी, कंगणा राणावत यांना आंदोलनासाठी आमंत्रित करत आहोत. आमच्या महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, महिलांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. जेव्हा युपीएचे राज्य होते, तेव्हा महागाईविरूद्ध महिलांचे नेतृत्त्व करत होत्या. रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या, आता सिलेंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. अशा प्रकारचे आंदोलन शिवसेना करणार आहे.

पुढे ते म्हणाले की, ज्या हिशोबात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. त्या पाहता देशात पेट्रोल आणि डिझेल ५० रूपयात स्थिर असायला पाहिजे. सिलेंडरच्या किमती ४०० रूपयाने खाली यायला हव्या. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, आम्हालाही ते कळते. या देशात सामन्य माणूस आणि गृहिणींची लूट सुरू आहे.

You may have missed