Sanjay Shirsat On Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर संजय शिरसाट यांचे भाष्य; म्हणाले – ‘काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू’
पुणे: Sanjay Shirsat On Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) मोठे यश मिळूनही मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून महायुतीचे सत्तास्थापनेचं घोडं अडलं आहे. मुख्यमंत्रीपद नाकारल्याने आणि गृहमंत्रीपदाच्या मागणीवरही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच शिंदे आपल्या दरे गावी केल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले.
एकनाथ शिंदे शुक्रवार (दि.२९) दरे गावात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी न बोलता थेट घरी गेले. यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय? याची उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी अडचणीत अथवा द्विधा मनःस्थितीत असतात त्यावेळी ते दरे गावी जातात.
या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला असून आमची नाराजी नाही आणि नाराजी असेल तर ती आम्ही उघडपणे बोलून दाखवू, असे म्हंटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले,” एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यायचा असल्याने ते त्यांच्या दरे या गावी गेले आहेत, यामध्ये तथ्य नाही. त्यांनी दिलेरपणाने आणि आत्मविश्वासाने सत्ता सोडली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. पण आम्ही लाचारासारखे नाटक करणारे लोक नाहीत.
पोटात एक आणि ओठांत एक, अशी आमची औलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असतं,
तेच आमच्या मनात असतं आणि नाराजी जरी असली तरी ती आम्ही उघडपणे जाहीर करू,” असं शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’
PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक
Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी
Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे