Santosh Bangar | ‘फोन पे’ प्रकरण शिवसेना शिंदे गटातील आमदाराच्या अंगलट; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: Santosh Bangar | राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. दरम्यान आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिंदें गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (Santosh Bangar)
काही दिवसांपूर्वीच हिंगोलीच्या कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना फोन पे द्वारे पैसे पाठवतो असे विधान केले होते. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संतोष बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station Kalamnuri) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बोलताना संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे
पाठवण्याचे विधान केले होते. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे.
त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागेल ते सांगा, तसं फोन पे करा,
असे संतोष बांगर म्हणाले होते.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल;
धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’
Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक
राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?