Sarasbaug Ganpati Pune | पुण्यातील सारसबागेतील गणपतीसमोर गर्दी जमवून आरती, तरुणावर गुन्हा दाखल; 10 निर्देशांचे पालन करण्याचे आदेश

Sarasbaug Ganpati Pune

पुणे : Sarasbaug Ganpati Pune | पुण्यातील सारसबाग येथील गणपतीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भावीक येत असतात. मात्र, गणपती समोर गर्दी जमवून आरती केल्याप्रकरणी एका तरुणावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. संग्राम खुबे (Sangram Khube) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला दहा निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिला आहे.

सारसबाग येथे नमाज पठण करण्यात येत असल्याची अफवा पसरल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानुसार दर शुक्रवारी आरती करण्याचे आयोजन संग्राम खुबे याने केले होते. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दहा निर्देशांचे पालन करणे बंधनकारक केल आहे. या घटनेचा हिंदू महासंघातर्फे (Hindu Mahasangh) अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी निषेध व्यक्त केला आहे.

पुण्यातील सारसबागेतील गणपतीला पुण्यातीलच नाहीतर राज्यभरातून गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने अनेक जण याठिकाणी येत असतात. परंतु गर्दी जमवून आरती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या निर्देशांचे पालन करण्याचे संग्राम खुबेंना आदेश

  1. भविष्यात कोणताही गुन्हा करणार नाही
  2. या खटल्यातील पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करणार नाही.
  3. केसची वस्तुस्थिती माहीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणतीही धमकी, प्रलोभन किंवा वचन देणार नाही जेणेकरुन त्याला अशी तथ्ये न्यायालयाला किंवा पोलीस अधिकाऱ्यांपासून उघड करण्यापासून परावृत्त करता येईल.
  4. आवश्यकतेनुसार/निर्देशानुसार न्यायालयासमोर हजर व्हावे.
  5. आवश्यकतेनुसार प्रकरणाच्या तपासात सामील व्हाल आणि तपासात सहकार्य कराल
  6. प्रकरणाच्या योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तपासाच्या उद्देशाने संबंधित कोणताही भाग न लपवता सर्व तथ्य सत्यतेने उघड कराल.
  7. आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रे साहित्य तुम्ही तयार कराल.
  8. तपासात पूर्ण सहकार्य / सहाय्य कराल.
  9. साथीदार खटल्याच्या तपास चाचणीच्या उद्देशाने संबंधित कोणताही पुरावा कोणत्याही प्रकारे नष्ट करु देणार नाही
  10. इतर कोणत्याही अटी, ज्या तपास अधिकाऱ्याने लादल्या जाऊ शकतात

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed