Sarjerao Kumbhar | लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन
पुणे : Sarjerao Kumbhar | लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (वय ५०) यांचे पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
सर्जेराव कुंभार हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे गावाचे रहिवासी होते.
विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून कार्यरत असताना गेल्या वर्षी त्यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची बदली झाली होती. १ जानेवारी रोजी जयस्तंभ येथील अभिवादन कार्यक्रमाचा त्यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद पोलिसांनी यशस्वी बंदोबस्त केला होता.
शनिवारी ३१ जानेवारी रोजी त्यांनी दिवसभर पोलीस ठाण्यातील कामकाज पाहून रात्री साडेनऊ वाजता ते पोलीस ठाण्यातून वडगाव शेरी येथील घरी गेले. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा त्यांना तातडीने खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, त्याचदरम्यान त्यांना जोराचा हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचे २ वाजून ०६ मिनिटांनी निधन झाले.
