Sarpanch Death In Accident Beed | बीड जिल्हा पुन्हा हादरला! भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, भीषण अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू, राख वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
बीड : Sarpanch Death In Accident Beed | राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात असणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत सरपंचाचा जागीच मृत्यू घडल्याची घटना परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाटा येथे घडली आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे अपघातात मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदाना गावचे सरपंच होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीवरून शनिवार (दि.११) रात्री साडेआठ वाजता काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर हे जोराच्या धडकेने रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर सरंपच क्षीरसागर यांचा मृतदेह परळी येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे, याचा तपास सुरु आहे.
यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी जिल्ह्यातील दहशतीचा मुद्दा मांडताना परळीमधील राखेसंदर्भात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देणार असल्याचे म्हंटले होते. “परळी तालुक्यात सर्वाधिक प्रदूषण होते. सिरसाळाजवळ गायरान ३०० वीट भट्टी आहेत. यामधील दीडशे लोक हे माजी पालकमंत्री यांच्या घरातील लोक आहेत. ते राखेची वाहतूक करत असतात”, असा खळबळजनक दावाही धस यांनी केला होता.
त्यामुळे आता सरपंचाच्या अपघाती मृत्यूनंतर परळीमधील राख वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या सौंदाना गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणदेखील होत आहे.
गेली अनेक वर्ष या भागात वीटभट्ट्यांमधून होणारे प्रदूषण आणि औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख,
त्याची वाहतूक करणारे टिप्पर यामुळे या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. (Sarpanch Death In Accident Beed)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच
ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका