Sassoon Hospital – Doctor Suspended | बेवारस रुग्णाला निर्जन स्थळी सोडण्यास मदत केल्याप्रकरणी ससूनमधील आणखी एक डॉक्टर निलंबित
पुणे : Sassoon Hospital – Doctor Suspended | ससून रुग्णालयाचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) आणि रितेश गायकवाड (Ritesh Gaikwad) यांनी सापळा रचून समोर आणली होती. त्यानंतर संबंधितांवर येरवडा पोलिसात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात संबंधित एका डॉक्टरला निलंबित करण्यात आले होते. मात्र या प्रकरणाबाबत इतरांवर कारवाई कधी होणार याबाबत ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या अगोदर निलंबित केलेला डॉक्टर कोणत्याही प्रकारचा अधिकारी नसून रेसिडेंट डॉक्टर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा घटनेला ससूनचे अधीक्षक, विभाग प्रमुख असे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याबाबत सवालही विचारले जात आहेत.
ससून रुग्णालयातील अस्थिरोग विभागातील एका ३२ वर्षीय बेवारस रुग्णाला २२ जुलै रोजी मध्यरात्री निर्जन स्थळी सोडण्यात आले होते. यावर तत्काळ कारवाई म्हणून डॉ. आदी कुमार (Dr Adi Kumar) याला निलंबित केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससूनच्या अधिष्ठात्याने चौकशी समिती स्थापन केली होती.
त्याचा अहवाल आल्यानंतर दुसऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना आता पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच दोन्ही निवासी डॉक्टरांना एका शैक्षणिक टर्मसाठी कॉलेज आणि वसतिगृहातून काढून टाकण्याची शिफारसही कॉलेजने केली आहे.
हा डॉक्टर देखील ऑर्थोपेडिक विभागातील प्रथम वर्षाचा कनिष्ठ निवासी डॉक्टर आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर डॉक्टरांसह रुग्णाला इमारतीच्या बाहेर घेऊन जात असल्याचे आढळून आले. परिचारिका कर्मचाऱ्यांसह इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचा या घटनेत सहभाग असल्याचे आढळून आले नाही. (Sassoon Hospital – Doctor Suspended)
अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के (Dr. Girish Bartakke)
यांनी त्यांना या घटनेची माहिती नव्हती, असे कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिलेले आहे.
तसेच त्यांचा या प्रकरणात सहभाग आढळून आलेला नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
“अंतर्गत समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे आणखी
एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने बेवारस रुग्णाला बाहेर काढण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे.
त्यावरून त्याला निलंबित करून पुढील सूचना मिळेपर्यंत शैक्षणिक उपक्रमातूनही निलंबित केले आहे.
तसेच दोन्ही डॉक्टरांना वसतिगृहातून आणि महाविद्यालयातून एका टर्मसाठी काढून टाकण्याचा निर्णय झाला असून,
तसा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग, संचालक आणि आयुक्तांना पाठवला आहे”,
अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार (Dr Eknath Pawar) यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार