Sassoon Hospital – Doctor Suspended | ससून रुग्णालयातील बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य करणारा डॉक्टर निलंबित

Sassoon Hospital

पुणे : Sassoon Hospital – Doctor Suspended | ससून रुग्णालयाचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यानंतर संबंधितांवर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड (Dadasaheb Gaikwad) आणि रितेश गायकवाड (Ritesh Gaikwad) यांनी सापळा रचून हा प्रकार समोर आणला होता. या प्रकरणात संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. मात्र तरीही ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकारानंतर ससूनचे डीन म्हणाले, याप्रकरणाची गंभीर दखल आपण घेतली आहे. संबंधित लोकांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिवाय याप्रकरणी तपास केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदी कुमार (Dr Adi Kumar) या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत तपास केला जात आहे.

रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून फुटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात आश्रय देण्याचे काम करणाऱ्या रितेश गायकवाड यांनी ससूनचे हे गंभीर प्रकरण समोर आणले होते.

त्यावेळी ते म्हणाले, “काल मी ससूनबाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर तिथे आला एका रुग्णाला सोडायचे आहे म्हणाला.
पुढे त्याने सांगितले की, बेवारस रुग्णांना सांभाळायला, त्यांच्यावरील उपचाराची कार्यवाही करायला त्रास होतो.
म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असतो. यासाठी आम्ही एक रिक्षावाला ठरवला असून,
यासाठी त्याला आम्ही 500 ते 600 रुपये देतो,” असे रितेश गायकवाड यांनी सांगितले. (Sassoon Hospital – Doctor Suspended)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य