Sassoon Hospital | ससूनमधील बेवारस रुग्णाला निर्जन स्थळी सोडल्याप्रकरणीचा समितीचा अहवाल गुलदस्त्यात; कोणतीही कारवाई नाही
पुणे : Sassoon Hospital | ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस रुग्णाच्या संदर्भाने जी घटना घडली त्या घटनेला आठ दिवस होऊनसुद्धा दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ससून अधिष्ठाता एकनाथ पवार (Dr Eknath Pawar) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक त्रिस्तरीय समिती नेमली होती. परंतु समितीचा अहवाल अजून गुलदस्त्यात आहे.
रुग्णाला बेवारस सोडल्याप्रकरणी रितेश गायकवाड (Ritesh Gaikwad) आणि दादा गायकवाड (Dadasaheb Gaikwad) यांनी अधिष्ठाता एकनाथ पवार यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांनी भेटणं टाळलं. मागील आठ दिवसांपूर्वी समोर आलेल्या या प्रकरणात पुढे नेमकी कारवाई काय झाली, समितीचा अहवाल काय आला? हे अनुत्तरित आहे.
अस्थिरोग विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षक यल्लापा जाधव (Yallappa Jadhav) यांना एकनाथ पवारांनी पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी अधिष्ठातांना भेटून डॉक्टरला निलंबित करण्यासाठी सांगितले होते.
ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदी कुमार (Dr Adi Kumar) यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल अन्य डॉक्टरही आक्रमक झाले आहेत. अस्थिरोग विभाग प्रमुख, समाजसेवा विभाग प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक हे या घटनेस जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. (Sassoon Hospital)
अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्यावर कारवाई न करण्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात निष्पक्षपाती चौकशी होण्याची शक्यता कमी वाटते.
दरम्यान रितेश गायकवाड व दादा गायकवाड यांनी पत्र लिहून
या प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश